भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन भारती विदयापीठ पोलीसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी ही माहिती दिली. आशिष मोरे, (वय ३३ वर्षे, रा. सध्या रा. युवराज बेलदरे यांचे बिल्डींगमध्ये भाडयाने, तिसरा मजला, फ्लॅट नंबर १०, वसंत मोरे यांच्या घराजवळ, कात्रज गावठाण, पुणे मुळ गाव मुपो भालकी, ता. बिदर कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडुन २,५०,००० रुपये किंमतीच्या ४ दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणून पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत होते. पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी यांना कात्रज, तलावाजवळ एक व्यक्ती हा दुचाकीवरुन फिरत असताना दिसुन आला. त्या इसमास दुचाकी गाडी क्रमांक MH42BC7295 हिच्यासह ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपासामध्ये ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील गुन्हयात चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे केले तपासावरुन आणखी तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार, अतिरीक्त कार्यभार सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.