चंदननगर पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : आरमन नानावत (टोळी प्रमुख) व त्याच्या १ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
चंदननगर पोलीसांनी ही कारवाई केली. अरमान नानावत,( वय २२ वर्षे, रा. पोटफोडे वस्ती, सोनी गोडाऊन मागे, वढु-खुर्द, ता. हवेली, जि. पुणे), ओंकार गायकवाड, (वय २० वर्षे, रा. काका चव्हाण यांचेकडे भाड्याने, चाकण रोड, शिक्रापुर), यांना दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.फिर्यादी हे मथुरा हौसिंग सोसायटीच्या जवळ हायफाय फॅशन कपड्याच्या दुकानाशेजारी संघर्ष चौक चंदननगर येथुन रस्त्याने कपडे घेण्यासाठी पायी चालत होते. त्यांच्या समोरुन मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन तोडुन नेले. म्हणुन फिर्यादी यांनी २ अनोळखी इसमांविरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी आरमान नानावत व त्याचा साथीदार याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. त्याने बेकायदेशीर मार्गाने हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेवली. संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. गुन्हे हे अवैद्य मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा मिळविण्यासाठी, टोळीच्या वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी सातत्याने चालु ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीच्या मार्गाने स्वतःचे आर्थिक फायदयासाठी गुन्हा केल्याचे दिसुन आले आहे. या टोळीने मागील १० वर्षात जबरी चोरी करणे, फौजदारीपात्र कट रचने इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. व यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, संजय पाटील हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, पोलीस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, सागर तारु, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांनी केली आहे. मोक्का अंतर्गत केलेली ही ११६ वी कारवाई आहे.
















