आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : लोहमार्ग पोलीस भरतीसाठी बनावट सर्टिफिकेट देणाऱ्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, यांनी शिक्षा सुनावली आहे. ही कामगिरी खडकी पोलीसांनी केली आहे.
आरोपी सागर राठोड, (वय ३१ वर्षे, रा. जयसिंगपुर, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला ३ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची तसेच २ वर्षे, सश्रम कारावास व २००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४ विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग आरती बनसोडे, खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टाचे कामकाज पाहणारे, पोलीस अंमलदार गणेश मुथय्या, सिध्दार्थ खंदारे, हरिभाऊ लोहकरे यांनी साक्षीदार, पुरावे न्यायालयात हजर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. कोर्टकेस साठी सरकारी वकील म्हणुन बकाल मँडम यांनी कामकाज पाहिले आहे.
