परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सोलापूर जिल्ह्यात व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिनांक २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता बारावीची व दिनांक १ मार्च ते २६ मार्च २०२४या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात दिनांक २१ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२४ या कालावधीत सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत कलम १४४ (१) (३) चे आदेश लागू करण्यात आले आहेत. अपरजिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
या कालावधीत फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत परीक्षा केंद्राभोवती शंभर मीटर परिसरात असलेली झेरॉक्स केंद्र, फॅक्स, एसटीडी, आयएसडी बुध, ई-मेल, इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रसार माध्यमे, संपर्क साधने यांचा वापर करण्यास बंदी आहे. परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या दोनशे मीटर परिसरातील एसटीडी, आयएसडी बुध, ई-मेल, इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत.हा बंदी आदेश विद्यार्थीना सोडण्यास आलेल्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परिक्षक, सुपरवायझर, शिपाई व शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना लागू नाही.
तसेच परिक्षा कालावधीत परीक्षा केंद्राभोवती १०० मीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे. हा बंदी आदेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीना सोडण्यास आलेल्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परिक्षक, सुपरवायझर, शिपाई व शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना लागू नाही.

















