महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आशिष, अमित, रुपेश मुले व इतर परिवार आहे.
सहकार, बँकिंग क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तीमत्व म्हणून ते राज्यभर ओळखले जात होते. सहकार, व्यापार अश्या अनेक क्षेत्रात त्यांनी मोठे यश मिळविल्याने त्यांना मॅनेजमेंट गुरु असेही संबोधले जात होते.
खानापूर हातलादेवी मंदिर शेजारील मोदाणी यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.















