हडपसर पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : गुन्हेगाराकडून १ रिक्षा आणि २ दुचाकी जप्त करून ३ गुन्हे उघडकीस करण्यास हडपसर पोलिसांना यश आले आहे.
दिलीप म्हेत्रे (वय २४ वर्ष रा. गल्ली नंबर ११ संकेत विहार काळेपडळ हडपसर) व विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १,५०,००० किंमतीच्या १ रिक्षा व २ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशनचे संतोष पांढरे, यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या.
त्यानुसार तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे व स्टाफ यांनी केलेल्या तपासाआधारे आरोपीला ताब्यात घेतले. दिलीप म्हेत्रे याच्याकडे केलेल्या तपासात त्याने हडपसर पोलीस ठाणे हद्दीतुन २ मोटार सायकल व १ रिक्षा चोरी केल्याचे सांगितले.
आरोपीकडून हडपसर पोलीस ठाण्याकडील ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५ आर राजा, यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभागाच्या अश्विनी राख, पोलिस निरिक्षक (गुन्हे), पंडीत रेजितवाड यांच्या सुचनाप्रमाणे पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, अनिरूध्द सोनवणे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांच्या पथकाने केली आहे.
