येरवडा पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : २ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील पाहिजे आरोपी जेरंबद करण्यात येरवडा पोलीसांना यश आले आहे.
अनिकेत उर्फ उऱ्या उरणकर (वय २५ वर्षे रा. गंगाधाम चौक मार्केटयार्ड) याला ताब्यात घेण्यात आले. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना माहिती मिळाली की, विश्रांतवाडी मधील पाहिजे आरोपी अनिकेत उर्फ उ-या उरणकर हा बर्निग घाट कोरेगाव पार्क येथे थांबलेला आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरुन कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे व तपास पथकाचे अंमलदार हे तेथे गेले असता एक व्यक्ती थांबलेला दिसला. त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबूली दिली.
व त्याचा गुन्हयातील सहभाग उघड झाल्याने त्याला पुढील कार्यवाहीसाठी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ (अतिरिक्त कार्यभार) विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, संजय पाटील येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस, निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे, यांच्या मार्गदर्शनाखाली किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांनी केलेली आहे.