बंडगार्डन पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : खुनाच्या गुन्हयातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बंडगार्डन पोलीसांना यश आले आहे.
करण लष्कर (वय २१ वर्षे रा. साठेनगर नारपोली, भिवंडी) दिनेश मोरे (वय १८ वर्षे) चंदन उपेद्र गौड (वय २८ वर्षे) कैलास धोत्रे (वय ४१ वर्षे) आकाश जाधव (वय २३ वर्षे) विशाल साबळे (वय २२ वर्षे) रामनाथ उर्फ पापा सोनावणे (वय २२ वर्षे रा.१३ ताडीवाला रोड) यांना अटक करण्यात आले आहे.
फिर्यादी यांचा अल्पवयीन मुलगा यांना वरील आरोपी यांनी व इतर ३ ते ४ अनोळखी व्यक्ती यांनी आपापसात संगनमत करुन वरळ देवी एल.व्ही. आर. हॉटेलच्या समोरुन अपहरण केले. त्याला मोटरसायकल वर घेऊन जाऊन त्यास जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांच्याकडील हत्याराने व दगडाने जबर मारहाण केली.
त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हयाच्या वेळीचे व्हिडीओ चित्रीकरण व सीसीटीव्ही फुटेजच्या स्क्रीन शॉटस प्राप्त झाल्याने त्याच्या आधारे या गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना व्हिडीओ चित्रीकरण व सीसीटीव्ही फुटेजमधील स्क्रीन शॉटस् मध्ये दिसणारा आरोपी हा बंडगार्डन पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांना आरोपी हा शंकर मंदिराजवळ, नदी किनारी, १३ ताडीवाला रोड, येथे असल्याची माहिती मिळाली.
तपास पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व स्टाफ यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा गुन्हा त्याने व त्याच्या इतर साथीदार यांनी केल्याची कबुली दिली आहे.
अनोळखी पाहिजे आरोपीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून पुढील कारवाईकरीता भिवंडी शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे, बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सुधीर घोटकुले, शिवाजी सरक यांच्या पथकाने केली.