पूना रिव्हरसाइड राउंड टेबल इंडिया 105 ने दिला फ्लाइट ऑफ फँटसीचा अनुभव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुरंदर येथील जिल्हा परिषद शाळेतील नऊ वंचित विद्यार्थ्यांना स्वप्नातील प्रवास अनुभवायला मिळाला. या मुलांनी पहिल्यांदाच पुणे ते मुंबई असा विमान प्रवास केला. पूना रिव्हरसाइड राउंड टेबल इंडिया 105 ने मुलांना फ्लाइट ऑफ फँटसीचा अनुभव मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्या अनुभवाने मुलेही हरखून गेली.
पुरंदरमधील या नऊ पात्र विद्यार्थ्यांना पुणे ते मुंबई असा पहिला विमान प्रवास अनुभवता आला. उत्साह आणि अपेक्षेने विद्यार्थी विमानात चढले. त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते कारण ते पहिल्यांदाच आकाशात झेप घेत होते.
मुंबईत आल्यावर, विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना शहरातील प्रतिष्ठित स्थळांची सफर घडवण्यात आली. गेटवे ऑफ इंडियापासून ते गिरगाव चौपाटी समुद्रकिनाऱ्याच्या निर्मळ सौंदर्यापर्यंत सारे काही मुलांनी अनुभवले.
या सहलीचे एक वैशिष्ट्य म्हणजे के. रुस्तमची भेट. विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केसर पिस्ता आइस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि T2 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय आणि ऐतिहासिक ताजमहाल पॅलेस हॉटेल येथे जाण्याचा आनंदही त्यांना मिळाला.
विद्यार्थ्यांसोबत PRRT105 चे अध्यक्ष परेश लोढा होते. त्यांना BRT2, BNRT 19, MMRT 200, MBRT 313 यासह मुंबईच्या टेबल्सनी यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला.
