राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर- मोहोळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोहोळ शहराच्या हद्दीत सोलापूर-पुणे रोडवर एका कारमधून हजार लिटर हातभट्टी दारुसह सवा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी मोहोळ शहर परिसरातील सोलापूर-पुणे महामार्गावर पाळत ठेवली होती.
सुनिल बाबुराव चव्हाण (वय 36 रा. गणपत तांडा, बक्षीहिप्परगा ता. दक्षिण सोलापूर) ही व्यक्ती मारुती सुझुकी एर्टीगा मधून पाच रबरी ट्यूबमध्ये पाचशे लिटर हातभट्टी दारु वाहतूक करतांना आढळून आली.
आरोपीच्या ताब्यातून 25 हजार पाचशे रुपये किंमतीची हातभट्टी दारु व नऊ लाखाची कार असा एकूण नऊ लाख पंचवीस हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे, दुय्यम निरिक्षक शिवकुमार कांबळे, जवान अण्णा कर्चे, अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.
