महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : 20 मार्च रोजी भोसरी येथे सकल जैन समाजाच्या वतीने उपाध्याय प्रवर प.पु. प्रवीणऋषीजी म.सा. यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.त्या संदर्भात महावीर प्रतिष्ठान येथे गौतम निधीच्या सर्व कार्यकर्त्याची मिटींग घेण्यात आली. गौतम निधीचे वरिष्ठ पदाधिकारी सतीश सुराणा अनिल नहार, किरण बोरा, राजेंद्र मनोत, महावीर नहार, पवन भंडारी,नितीन संकलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली या मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतम निधीच्या विहार समितीच्या टी- शर्ट चे अनावरण करण्यात आले.

 
			

















