महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : भाग्यकांता संचलित शब्दरंग आयोजित “अमृतातेंही पैजां जिंके” हा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला.
त्या कार्यक्रमांतर्गत मराठी भाषेतील गोडी वाढीस लागावी म्हणून अतिशय आगळ्या-वेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या त्यामधे कविता लेखन,पत्र लेखन, पुस्तक परिचय, काव्य अभिवचन ,कथाकथन अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व परिक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी व तालुका प्रशासन अधिकारी श्री अनिल बनसोडे, श्री दिपक दुधनकर ,सौ सविता देशमुख, सौ अबोली सुलाखे,श्री सचिन उकिरडे, श्री अभय चव्हाण, प्राचार्य सोनकांबळे उपस्थित होते.
या स्पर्धांना समाजाच्या सर्वच स्तरांमधून आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वात लहानग्या स्पर्धकाचे वय तर अवघे साडेतीन वर्षे होते. लब्धी गांधी या चिमुरडी ने गवताचं पातं ही कुसुमाग्रजांची कविता सफाईदारपणे सादर करून परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धांना बार्शीसह सोलापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी इथूनही स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात ज्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेते पुढीलप्रमाणे या कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख डॉ. सौ. गौरी कैवल्य गायकवाड यांच्यासह भाग्यकांता अध्यक्षा सौ सुनिता गाडेकर , खजिनदार श्री महेश उकिरडे या सर्वांनी भरपूर परिश्रम घेतले.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सोनकांबळे यांनी या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. अतिशय आनंदी आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन स्वराज लोखंडे, निर्भय चव्हाण, सौ. गुंजन जैन, सौ. विद्या काळे , प्राची देशमुख यांनी पाहिले. सूत्र संचालन डॉ. कैवल्य गायकवाड तर आभार प्रदर्शन श्री. महेश उकिरडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी बक्षीस वाटप म्हणून प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि मेडल्स आणि सर्व सहभागी लहान मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यासाठी स्पॉन्सर म्हणून व्ही . के. मॉल चे श्री. झंवर, तसेच श्री रवि बजाज, लायन्स क्लब बार्शी टाऊन तर्फे डॉ. श्री योगेश कुलकर्णी, देशमुख हाईट्सच्या सौ. सविता देशमुख, श्री. निलेश परमार तसेच सौ. सुनिता गाडेकर यांनी आर्थिक सहाय्य केले. कार्यक्रम उत्तम झाला आणि रसिक प्रेक्षक कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये चिंब भिजून घरी परतले.

 
			

















