सुमारे 1 लाख किंमतीचे 2000 लिटर गुळमिश्रीत रसायन नष्ट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर येथे चोरून अवैधरित्या गावंठी हातभट्टी दारू तयार करणा-या आरोपीवर कारवाई करण्यात आली.
निलेश पवार (रा.मुळेगाव तांडा) याला अटक करण्यात आले आहे. 1 लाख 4 हजार 500 रुपये किंमतीचे 2000 लिटर गुळमिश्रीत रसायन 10 प्लॅस्टीक बॅरेलसह नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर तालुका अधिकारी व पोलीस अंमलदार हे दिनांक 29 फेब्रुवारी रोजी चोरून अवैधरित्या गावंठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आरोपींवर ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने कारवाई करण्याकरिता शिवारात पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी आरोपी निलेश तोळराम पवार हा मुळेगाव तांडयाच्या पुर्व बाजुस असलेल्या चिल्लारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य बाळगुन असल्याची माहिती मिळाली.
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी छापा टाकुन त्यांच्यावर कारवाई केली आहे. चोरून अवैधरित्या चालणा-या देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत 1 लाख 4 हजार 500 रूपये किंमतीचे 2000 हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, 10 प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करण्याकरीता लागणारे साहित्य सापडले.
यात हातभट्टी उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. तसेच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याच्याकडुन होत आहे.
तसेच त्याच्याविरूध्द योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग संकेत देवळेकर यांनी सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका,पोलीस ठाणे नामदेव शिंदे, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील नागाबाई गंपले, बाळु राठोड, शहाजी कांबळे, संतोष मिस्त्री, मनोज भंडारी, वैशाली कुंभार व आसिफ शेख यांनी बजाविली आहे.