११०० रक्तदात्यांनी केले रक्तदान : प्रकाश धारीवाल मीत्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
शिरुर : प्रसिद्ध दानशूर उद्योगपती स्व. रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक १ मार्च २०२४ रोजी प्रकाश धारीवाल मित्र परीवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ११०० जणांनी रक्तदान करत शिरुर शहरात रक्तदानाचा विक्रम केला.
याच कार्यक्रमात पर्यावरण जनजागृती अंतर्गत रसिकलालजी धारीवाल यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त ८५ सायकलचे वाटप करण्यात आले शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात सकाळी ८ ते सायंकाळी ६ यावेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबीराचे उदघाटन दानशूर उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी केले. सकाळी ११ पर्यंत ३०० हून आधिक जणांनी रक्तदान केले होते तर शिबीर संपेपर्यंत ११९२ एवढे विक्रमी रक्तदान प्रथमच शिरुर शहरात झाले.
यावेळी उद्योगपती आदित्य धारीवाल, दीना धारीवाल, रक्तांचे नात्याचे रामभाऊ बांगड, नगर परिषद मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे, प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम, शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, मनसुख गुगळे, नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी नगरसेवक विजय दुगड, माजी सभापती संतोष शितोळे, प्रशांत शिंदे, माजी सभापती शरद कालेवार, तुकाराम खोले, माजी नगरसेवक विनोद भालेराव, नीलेश जाधव, सुशांत कुटे, किरण बनकर, व्यवसायिक सुभाष गांधी, किरण बनकर, लक्ष्मीकांत खाबिया, सुनील बोरा, मयुर नहार, प्रा. विलास आंबेकर, भरत कालेवार आदी उपस्थित होते.
शिबीराला भाजपाच्या नेत्या जयश्री पलांडे, डॉ. सुनील शेळके आदीनी भेट दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, सी पी बोरा, माजी नगरसेवक विजय दुगड आदींची भाषणे झाली. याच कार्यक्रमात पर्यावरण जनजागृती अंतर्गत धारीवाल यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त ८५ सायकलचे वाटप करण्यात आले.
