महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दिनांक ६ मार्च रोजी आठवडी बाजार झोलापूर मारुती जवळ भूम येथे व ७ मार्च रोजी भुम तालुक्यातील गोलेगाव पारधी वस्ती येथे एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी, पारधी, विमुक्त जाती जमाती, वडर, कैकाडी, मसाण जोगी, डवरी, सापवाले, घिसाडी, कोल्हाटी, कुरमुऱ्या वाले व भटक्या समाजाच्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे, रेशन कार्ड, मतदार यादी मध्ये त्यांचे नाव नोंद करून घेणे, आधार नोंदणीकरण करणे, संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ देणे, यासह विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने हे आयोजन करण्यात आले आहे.
गोलेगाव पारधी वस्ती येथे ७ मार्च रोजी कॅम्पचे आयोजन केलेले आहे. तालुक्यातील या सर्वांनी या कॅम्पमध्ये विविध प्रमाणपत्र काढून घेण्याचे आव्हान तहसीलदार जयंतराव पाटील यांनी केले आहे.
