सोलापूर : महाशिवरात्रीच्या अनुषंगाने विविध खाद्यपदार्थ, अन्न उत्पादन विक्रेते, व्यावसायिकांसह किराणा दुकान व वितरकांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
खाद्यतेल, साबुदाणा, भगर यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतुरकर यांनी सांगितले. नागरिकांनी नोंदणी परवानाधार व्यवसायिकांकडून अन्नपदार्थ विकत घ्यावेत.
भगर किंवा साबुदाणा पॅकबंद व ब्रॅण्डेडच विकत घ्यावे. मुदतबाह्य दिनांक, समूह क्रमांक, खुले व पॅक बंद पहावे, विना लेबल असलेली भगर व भगरीचे पीठ बाजारातून विकत घेऊ नये. भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुऊनच खाण्यासाठी वापरावी.
महाराष्ट्र राज्यात कोद्रा प्रकारच्या भगरीच्या सेवनाने बऱ्याच वेळा अन्नविष बाधा सारख्या अनुचित घटना घडलेल्या आहेत त्यामुळे सर्वांना व्यवसायिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी कोद्रा भगरी सारख्या हलक्या प्रतीच्या भगरीची विक्री करू नये, प्रसादाला धूळ, माती, माशा व मुंग्या, किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी.
खाद्यतेलाचा पुनर्वापर करू नये. दूध व दुग्धजन्य पदार्थ ताजे तयार करावेत. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ धुवावीत. कच्चे अन्नपदार्थांसह अन्य घटक पदार्थांच्या खरेदीचे बील तपशील व्यवस्थित ठेवावेत, असेही त्यांनी सांगितले.
