महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल
पुणे : आकुर्डी – निगडी – प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या पदाधिकार्यांनी संघाध्यक्ष सुभाष ललवाणी यांच्या नेत्रुत्वात उपाध्याय प्रवर पु. प्रविणऋषिजी म.सा व मधुर गायक पु. तिर्थेषऋषिजी म.सा. यांच्या दर्शनाचा, प्रवचनाचा, मंगलपाठाचा लाभ आलेफाटा येथे घेत २० मार्च ते ४ एप्रिल २०२४ च्या पिंपरी-चिंचवड येथील वास्तव्यादरम्यान आकुर्डी-निगडी-प्राधिकरण स्थानक भवनात येण्याची व भक्तांना अम्रुत वाणीचा लाभ देण्याची विनंती केली.
पिंपरी चिंचवड वास्तव्यादरम्यान सकल समाजाच्या वतीने व गौतम निधी परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. होली चातुर्मास, गौतम निधी संकलन, आचार्य भगवंतांची पुण्यतिथी, एकांतर आराधना धारणा, विविध श्री संघाच्या क्षेत्रात विचरण, प्रवचन आदि सह विविध ॲानलाईन गर्भधारणा, अर्हम विद्या क्लासेसचा लाभ लाखो भाविकांना होणार आहे.
यावेळी आलेफाटा संघाचे संतोष कोठारी, विजय गांधी, जवाहर मुथा, राजेंन्द्र छाजेड, मोतीलाल चोरडीया, पोपटलाल कर्नावट, सुर्यकांत मुथीयान, नेनसुख मांडोत, दिलीप फिरोदिया, प्रकाश मुनोत, विक्रम छाजेड, वैभव छाजेड आदि मान्यवर उपस्थित होते.
