जीप व कार मध्ये झाला होता अपघात : धाराशीव जिल्ह्यातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : अपघातातील मृताच्या वारसास 98 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असून 16 डिसेंबर 2019 रोजी जीप व मोटार सायकलचा अपघात झाला होता.
जीप व मोटार सायकलच्या अपघातामध्ये दुचाकीवरील बाळासाहेब घुटे (शिक्षक),(रा.ईडा, ता.जि. बीड) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे वारसाने मोटार अपघात न्यायाधिकरण भूम यांच्या न्यायालयात नुकसान भरपाईसाठी 2020 मध्ये अॅड. पंडितराव ढगे यांच्यामार्फत वाहन मालक व विमा कंपनीच्या विरुद्ध नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता.
यावेळी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले तसेच साक्षी पुरावाही करण्यात आला. परंतु अर्जदार व गैरअर्जदार विमा कंपनी यांच्यामध्ये 3 मार्च 2024 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांत 98 लाखात तडजोड करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यातील लोक न्यायालयातील ही सर्वात मोठी तडजोड असून ती जिल्हा न्यायाधीश एस. आर. उगले, जिल्हा न्यायाधीश एस.आर.पाटील, जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. माने यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे विमा अधिकारी प्रमोद कुमार (रिजनल मॅनेजर), के. पी. पवार (टी. पी. हब इनचार्ज), श्रेयश खडकीकर, अर्जदाराचे वकील अॅड. पंडितराव ढगे, विमा कंपनीचे वकील अॅड. एस. पी. दानवे यांच्या सहकार्याने झाली.

















