महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : स्व.इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने गरजू कामगार महिलांना साडी वाटप करण्यात आले.
राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, आयोजक अभय संचेती, संतोष नांगरे, रायकुमार नहार, राजेंद्र बाठीया, उत्तम बाठिया, चंद्रकांत मानकर, मंगला संचेती, गौरी भटेवरा, यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.
मार्केट यार्ड भुसार बाजारात मध्ये दैनंदिन काम करणाऱ्या आणि खरेदीसाठी येणाऱ्या हजारो ग्राहकांच्या पिण्याच्या पाण्याची सोयीसाठी सालाबाद प्रमाणे पाणपोई आणि उन्हाळ्यामध्ये पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी किरण छाजेड, मनीष संचेती, जेठमल दाधीच, विजय शिंगवी, सुभाष पगारीया, ललित पगारिया, नितीन नहार, सुरेंद्र श्रीश्रीमाळ, सुनील गुंदेचा, राजू लुनिया, शैलेश शहा, प्रवीण नहार आदी उपस्थित होते.
सुरेश वानगोता, हरकचंद देसर्डा, संकेत बोथरा, विशाल चांदणे, अयुब शेख, विकास सावंत, रोहिदास मानकर, सुनील दसाडे, किरण कटके हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन अभय संचेती यांनी केले.
“महिला दिनाच्या निमित्ताने संचेती ट्रस्ट तर्फे गरजू कामगार महिलांना साडी वाटप करण्याचा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने महिला दिनाचे सार्थक झाल्या सारखे वाटते तसेच मानव भावना जिंवत ठेवत उन्हाळयात नागरिकांना पाणपोई तसेच पशु पक्ष्यांच्या साठी विचार करून त्यांच्या साठी धान्य व पाण्याची व्यवस्था पाहून मनापासून आनंद वाटला अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून संचेती परिवाराच्या वतीने केलेल्या कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे असेही कुलकर्णी म्हणाल्या.” – मेधा कुलकर्णी
“सध्या पुणे शहरा मध्ये प्रंचड ऊन पडत आहे. ईतक्या उन्हात व्यापार करण्यासाठी येणारे व्यापारी, ग्राहक, ट्रक चालक, हमाल बंधू, रिक्षावाले यांच्यासह असंख्य नागरिक येथे येतात. समाज हितार्थ ट्रस्टच्या वतीने केलेली पाणपोईची व्यवस्था उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल.” – स्वप्नाली शिंदे
“उन्हाळ्यात बाहेर गावातून हजारो नागरिक मार्केट यार्ड मध्ये येतात. पाण्यासारखे पुण्य नाही हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षापासून असे उपक्रम आम्ही करत असताना मानसिक समाधान मिळते.” – अभय संचेती
