महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : योगसाधना या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वुमन ऑफ द इयर पुरस्कार-२०२४ जाहीर करण्यात आला. राखी गुगळे यांना वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वेद ब्रह्मा योगा क्लासेसच्या संस्थापिका राखी गुगळे यांना त्यांच्या योगातील गौरवास्पद कार्यामुळे एकमताने हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी योगसाधना संस्थेच्या अध्यक्षा विणाताई सहस्रबुद्धे यांच्या महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या योग संस्थेला 40 वर्षे पूर्ण झाली. महिला या देशाच्या निम्म्या लोकसंख्येच्या असून त्यांना समाजात प्रोत्साहन दिल्याशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकणार नाही.यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, भारती विद्यापीठाच्या प्रोफेसर अस्मिता फडके, कॅन बायोसिसच्या संचालिका संदीपा कानिटकर आणि वैशाली रायकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.















