23 मार्चला छ गाव भावयात्रा : अनेक साधु संत राहणार उपस्थित
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : कात्रज – कोंढवा रोडवरील शत्रुजंय मंदिरात नूतन मंदिरांची १६ वी सालगीरा अतिशय धार्मीक वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरातील अतिप्राचीन आदिनाथ भगवानच्या मंदिराची ध्वजा बदलण्यात आली.
डहेलावाला समुदायके प. पु. आचार्य श्रीमद विजययशोभद्रसुरीश्वरजी म.सा., प.पु. आचार्य श्री पियुषभद्र सुरी म.सा. यांच्या प्रेरणेने ह्या मंदिराची उभारणी झालेली आहे.
येत्या 23 तारखेला या मंदिरात फागण फेरी छ गाव भावयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हजारो बांधव या यात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या कर्माची निर्जरा करीत असतात. यावर्षी या यात्रेला १५ हजारहून अधिक भावीक येण्याची शक्यता मंदीर समितीने वर्तवली आहे.
23 तारखेला सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने संजय शहा, पारसमलजी लुंकड, भरत भुरट, अल्केश लुंकड, अभिजीत डुंगरवाल यांनी केले आहे.
