मुंढवा पोलिसांनी केली चौघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : रिक्षातून आलेल्या चार जणांनी एका तरुणाकडे मोबाईलची मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच धारदार चाकूने हातावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार केशवनगर मुंढवा येथे घडला.
सारंग गायकवाड उर्फ साऱ्या (वय-19), ऋषीकेश उर्फ भोऱ्या गोवर्धन कांबळे (वय-23 रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे), अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड (रा. म्हसोबा मंदीराजवळ), हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड (वय-21 रा. मुंगसेआळी, केशवनगर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
याबाबत आदित्य दत्तात्रय कांबळे (वय-22 रा. जांभळे प्लॉट, शिंदे वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला.
आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना मिळालेल्या माहितीवरुन सारंग गायकाड व ऋषीकेश कांबळे यांना अटक केली. तसेच फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे यांना मिळालेल्या माहितीवरुन अभिषेक गायकवाड व हेमंत गायकवाड यांना अटक केली.आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासोबर निकम, सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे, सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे, दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, दिपक कदम, राहूल मोरे, स्वप्निल रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.
