शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळीप्रमुख अमित चव्हाण व त्याच्या साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी ही कामगिरी केली.
अमित चव्हाण (वय २७ वर्ष, ससानेनगर लेन नं.०२ निकम हाईटस ३ रा मजला हडपसर) नेहा सोनवणे, (वय २० वर्ष, रा. निगडी ओटास्किम सेक्टर नं.२२ सजंय स्वीटजवळ, निगडी) यांना अटक करण्यात आली. फिर्यादी हया चिंचवडगावकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसमध्ये उभ्या असताना बस छत्रपती शिवाजी ब्रिजवर पुणे मनपा येथे आली.
तेंव्हा आरोपी अमित चव्हाण व नेहा सोनवणे यांनी संगनमताने फिर्यादी यांच्या उजव्या हातातील एक सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने तोडली. ती हातातुन हिसकावुन घेऊन बांगडीसह पळुन जात असताना त्यांना पकडले. फिर्यादी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
आरोपी अमित चव्हाण यांने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन त्यानी बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर केला.
हिसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवले. संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे.
त्यांच्या विरुध्द पुणे शहरामध्ये स्वतःचे अवैध आर्थिक फायदयाकरीता, चोरी करणे, जबरीचोरी करणे, दरोडा टाकणे, दुखापत करणे, हत्याराचा धाक दाखवुन लुटणे, विनापरवाना घातक हत्यार जवळ बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, व अन्य शरिराविरुध्दच्या गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ १ संदिपसिंह गिल्ल, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे चंद्रशेखर सावंत सहायक पोलीस निरिक्षक कैलास डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार संतोष मेमाणे, रोहित झांबरे, दिलीप नागरे, नलीनी क्षिरसागर, स्वालेहा शेख यांनी केली आहे. मोक्का अंतर्गत केलेली ही १५ वी कारवाई आहे.
