पुण्यात उपचार सुरु
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना छातीत इन्फेक्शन आणि तापामुळे पुण्यातील भारतीरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रतिभा पाटील यांना बुधवारी रात्री येथील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. त्यांना ताप असून छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्षे असून मागील काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती आहे. बुधवारी (ता.१३) त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
प्रतिभा पाटील यांची देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ओळख आहे. २००७ ते २०१२ या काळात त्या राष्ट्रपतीपदी विराजमान होत्या. पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळात विविध मंत्रिमंडळ खाती सांभाळली असून त्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात त्यांनी पद भूषवली आहेत. याशिवाय, त्या राज्यातही काही वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा होत्या.
