महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या विरोधात विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.
आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सोलापूर शहरात लागु केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करुन आंदोलन केले. याविरोधात फिर्यादी जाकीर हुसेन अब्दुलमजीद शेख (वय 51) वर्षे यांनी सदर बझार पोलीस स्टेशन, सोलापूर येथे फिर्याद दिली होती.
या प्रकरणी निलेश संगेपाग (वय 21 रा. 143 / 44, कोनापुरे चाळ सोलापूर), महादेव मोरे (जिल्हाध्यक्ष, वय 58 रा पंढरपुर), प्रसाद भागानगरे (वय 28 रा वळसंग), राजेद्र भोसले (वय – 46 रा मु. पो सरकोली), बंडु मोरे (वय 45 रा मु. पो. चळे), नीहाल किरनाळ्ळी (वय 28 रा रंगभवन, सोलापूर), आनंद पाटील (वय 34 रा कुरुल), सुचित्रा वाघमारे (वय – 59 रा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर), मल्लीकार्जुन पिलगीरी (वय 40 रा बापुजी नगर सोलापूर), श्रीकांत
वाघमारे (वय 62 रा मल्लीकार्जुन नगर सोलापूर), फकरोद्दीन हुसेन पठाण (वय 66 रा मु. पोस्ट धोतरी), मंजुर खानापुरे (वय 36 रा सहारा नगर सोलापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, पोलीस निरीक्षक अजित लकडे, गुन्हेशाखेचे ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिवळे, पोलीस उपनिरीक्षक व आयबी पथक यांनी भेट दिली.
