महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणूक नियोजन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच महिला पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षांमध्ये प्रवेश घेऊन त्यांच्या सुद्धा निवडी करण्यात आल्या. बार्शी तालुका महिला कार्याध्यक्ष पदी शीतल मांजरे, शहर महिला कार्याध्यक्ष पदी सायरा मुल्ला व राष्ट्रवादी काँग्रेस श.प शहर उपाध्यक्ष पदी रवींद्र थोरात, सचिव पदी ऍड बिडबाक यांची निवड करण्यात आली.
बैठकीत महाविकास आघाडीला बार्शी तालुक्यातून अधिकतम मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच बूथ स्थरावर कार्यरत असणाऱ्या यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. पदाधिकारी मेळाव्या साठी पक्षाचे नेते विश्वास बारबोले, राष्ट्रवादी युवक राज्य उपाध्यक्ष कृष्णराज बारबोले, राष्ट्रवादी ग्रंथालय राज्य चिटणीस शिवशंकर ढवण, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल पटेल, युवक जिल्हाउपाध्यक्ष शरद गायकवाड, विधानसभा अध्यक्ष भारत देशमुख, तालुका अध्यक्ष महेश चव्हाण, वैराग्य विभाग अध्यक्ष पाटील, महिला तालुकाध्यक्ष देवशैला जाधवर, शहर अध्यक्ष किरण देशमुख, लीगल सेल अध्यक्ष ऍड हर्षवर्धन बोधले, शहर युवक अध्यक्ष आदेश वाणी, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष समीर सय्यद, सामाजिक न्याय विभाग शहरअध्यक्ष मक्रोज बोकेफोडे, विध्यार्थी अध्यक्ष आदित्य पाटील, सर्व कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष व प्रभाग प्रमुख तसेच कार्यकर्ते उपास्थित होते.
