सिंहगड रोड पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुणे जिल्ह्यातुन तडीपार असलेल्या सराईतास जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी सिंहगड रोड पोलीसांनी केली आहे.
आदेश ऊर्फ ऋषिकेश टेमकर (वय २१ वर्षे रा. सुसगाव सुवर्ण युग तरुण मित्र मंडळ गणपती मंदीराच्या मागे टेमकर वस्ती मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक ५० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकुण ५१,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन याच्या आदेशाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयीत व्यक्ती तपासत होते. ही व्यक्ती नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याला पकडण्यात आले.
त्याच्याकडे अधिक चौकशी करता तो हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथील रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्यास पुणे जिल्ह्यातुन एका वर्षाकरीता तडीपार करण्यात आले असल्याची माहीती समोर आली. त्याला अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भाडंवलकर हे करीत आहे.
आरोपीविरुध्द वेगवगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग (अतिरिक्त पदभार) सिंहगड रोड विभाग भिमराव टिळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारु, राजु वेगरे, विकास मोहीते यांच्या पथकाने केली.
