महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ मनोज वीर यांना १ मे रोजी महावितरणच्या वतीने कामगार दिनानिमित्त देण्यात येणारा उत्कृष्ट कामगार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
झोन ऑफिस लातूरचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विशाल पवार, सुनील कापसे, वैभव गिराम उपस्थित होते मनोज वीर यांनी महावितरण कार्यालयात १० वर्ष सेवा केली असून या कालावधीत कार्यालयाची वसुली, ग्राहकांना विनातक्रार विद्युत पुरवठा सुरळीत देऊन तातडीने समस्या सोडवल्या आहेत.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
