वीरशैव लिंगायत समाजाची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : भूम शहरांमधील बाजार तळाजवळ असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाचे गुरु वीर स्वामी मठ मंदिर परिसरातील प्रातविधी मुळे होणारी घाण (हागणदारी) बंद करण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाज भूमच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
भूम शहरातील बाजार तळाजवळ वीरशैव लिंगायत समाजाचे गुरुविर स्वामी मठ अंतर्गत (मानूर) श्री नागनाथ देवस्थान, श्री महादेव मंदिर व शेकडे वर्षापूर्वीचे श्री गुरुचे समाधी स्थळ आहे. हे मंदिर समाजाचे श्रद्धास्थान असून त्या ठिकाणी नियमितपणे पूजा होते. इतर वेळी महत्त्वाचे उत्सव साजरे करण्यात येतात. परंतु या जागेत आसपासच्या महिला पुरुष उघड्यावरच प्रांत विधीसाठी बसतात त्यामुळे दुर्गंधी पसरते व घाण होते.
मंदिराभोवती कंपाउंड घातले आहे तरीसुद्धा सदरील परिसरात व बाजूला घाण होऊ नये व परिसरातील स्वच्छता राहणेसाठी आपल्या पातळीवर उपाययोजना राबवून सदरील मंदिर व मठाचा परिसर हागणदारी मुक्त करावा अशी मागणी वीरशैव लिंगायत समाज भूमीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, नगरपरिषद भूम यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनावर शिवशंकर खोले, सिद्धेश्वर मंनगिरे, अशोक तोडकर, महादेव मंनगिरे, महेश मनगिरे, शाम होळकर, मधुकर शेटे, गणेश वासकर, सुनील माळवदे, स्वप्निल आवटे, धनंजय शेटे, ओम स्वामी, अतुल स्वामी, इष्टलिंग विश्वकर, किरण दंडनाईक आदी समाज बांधव उपस्थित होते.
