महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : दहावी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये बार्शीच्या फिनिक्स पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
2023 – 24 या शैक्षणिक वर्षात एकूण 13 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये राजेश्वरी लहू मासाळ या विद्यार्थिनीने (95.5%)गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक व बार्शी तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर शर्वरी भोसले हिने (90.6%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कुणाल करळे याने (88.5%) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
परीक्षेला बसलेल्या तेरा विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थ्यांनी 75% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. तर 13 पैकी 13 विद्यार्थ्यांना 67% पेक्षा जास्त गुण मिळाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या संचालिका वैशाली कबाडे, संचालक संदीप बरडे, शाळेचे प्राचार्य लोकेश कुमार शाह, उप प्राचार्या अभिलाषा सारंगदेव व शिक्षकांनी यश प्राप्त व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
