शिवराज्य सेनेच्या वतीने आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : शिवराज्य सेनेच्या वतीने कसबा पेठ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मंडळाच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून साधारण ४० स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा ५ वजनी गटात घेण्यात आली. सहभागी स्पर्धकांना रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर डॉ. बी. वाय. यादव, डॉ. संजय अंधारे, विनोद वाणी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मराठा महासंघाचे बाळासाहेब गव्हाणे, शिवराज्य सेनेचे प्रमुख हर्षवर्धन पाटील, कार्याध्यक्ष प्रितम पाटील, शिवसेना शहरप्रुख विजय माने, राष्ट्रवादी शहरप्रुख शरद पवार गट किरण देशमुख, दादासाहेब गायकवाड, उबाटा शिवसेना शहरप्रमुख दिनेश नाळे, राष्ट्रवादी शहरप्रमुख संताजी सावंत, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष महेश चव्हाण, श्रीकांत शिंदे, सूरज बाप्पा ढमधेरे,मराठा सेवा संघाचे किरण गाढवे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार डॉ. सचिन चव्हाण, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार जाणीव गोशाळा व शिवकार्यसाठी भूम येथील तुळजाई दुर्गरक्षक प्रतिष्ठान यांना देण्यात आला.
त्याचसोबत मंगेश दहीहंडे यांची वाहतूक निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
त्यानंतर भगवंत श्री स्पर्धा ५ वजनी गटात झाली. या वर्षीचा भगवंत श्रीचा मानकरी ठरला तो अकलुजचा मजलुम इराणी.
रोख रक्कम ११०००, स्मृतिचिन्ह व भगवंत श्री किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर सर्व गटातील स्पर्धकांना प्रथम द्वितीय तृतीय व चौथ्या क्रमांकचे रोख ८००००ची बक्षीस, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समिती प्रमुख अमोल देशमाने, उपप्रमुख महेंद्र देवकर, श्रेयस परदेशी, आकाश राऊत, नितीन माने, युवराज ढगे,राज जगताप, सोपान डोईफोडे, सोमा दंबरे, संदीप पाटील, विवेक भागवत, अजीम तांबोळी यांच्यासह शिवराज्य सेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अनिकेत कारंडे यांनी केले तर आभार आदित्य कापसे यांनी केले.