• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये जाऊन कारवाई

February 16, 2026
0
16 2 26 5
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त : ४ कोटी २७ लाखांचा माल जप्त

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : पुण्यात येणाऱ्या अवैध शस्त्रांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटी गावात जाऊन पिस्तुले बनविणारे कारखाने उद्ध्वस्त केले होते. त्याचप्रमाणे पुण्यात अंमली पदार्थांची तस्करी करणारे राजस्थानमधील रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पुणे व राजस्थानमध्ये एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करून ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खराडी येथील सार्वजनिक रस्त्यावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघांना पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून २७ ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ व अन्य साहित्य असा १२ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला.

या गुन्ह्यात मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. वाघोली) आणि हरिष सुजना रामदेवासी (वय २२, रा. वाघोली) या दोघांना ३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांचे गिफ्ट शॉप असून ते मूळचे राजस्थानमधील जोधपूरचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षभरापासून ते अंमली पदार्थांचा व्यवसाय करीत असल्याचे तपासात उघड झाले.

मोतीसिंह राजपुरोहित याच्याकडे केलेल्या तपासात योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई हा राजस्थान येथून एमडी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी ७ फेब्रुवारी रोजी मनीष बिष्णोई (वय ३०) याला सापळा रचून पकडले व त्याच्याकडून ३० लाख २० हजार रुपयांचे १५१ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले.

त्याच्याकडील चौकशीत त्याचा मावस भाऊ सचिन ऊर्फ एस.के. रमेशकुमार बिष्णोई (वय २०) हाही अंमली पदार्थ घेऊन आला असल्याचे समजले. त्याला हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एमडी विक्री करून मिळालेले ४ लाख ६५ हजार रुपये जप्त करण्यात आले.

त्याने अमित सुनिल घुले (वय ४०, रा. मांजरी) याला अंमली पदार्थ विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अमित घुले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ७९ लाख ६० हजार रुपयांचे ३९८ ग्रॅम मेफेड्रॉन व दोन मोबाईल असा १ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

या गुन्ह्याच्या तपासाचा आढावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि निखील पिंगळे यांनी घेऊन राजस्थान येथील अंमली पदार्थ व्यवसायात सक्रिय असलेल्या टोळीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याबाबत मार्गदर्शन केले.

त्यासाठी खास तपास पथक तयार करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना तपासाबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या अधिपत्याखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, मनोज बागल, नितीन राठोड व पोलीस पथक तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक असे एकूण ५ अधिकारी व २० अंमलदार यांची ५ स्वतंत्र पथके तयार करून त्यांना ९ फेब्रुवारी रोजी राजस्थानला रवाना करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार श्रीकांत शेडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, सुरेंद्र साबळे, निलम कर्पे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोद्रे, तांत्रिक विश्लेषक सुरज जाधव, विलास केदारी, अशोक केदार, वाघोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार पांडुरंग माने, गहिनीनाथ बोयणे, सुनिल कुसाळकर, लोणीकंद पोलीस ठाण्याचे अमोल ढोणे, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार अंकुश जोगदंड, लालू कर्‍हे, राहुल जोशी, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस अंमलदार अमोल सोनवणे, संदीप जाधव, तांत्रिक विश्लेषक प्रविण गव्हाणे यांनी केली.

रतनलाल चौधरी मुख्य सूत्रधार – तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पुण्यात पकडलेल्या दोन आरोपींना सोबत घेऊन राजस्थानला जाऊन आरोपींची घरझडती घेतली. त्यांच्या संपर्कातील एमडी अंमली पदार्थाचा मुख्य वितरक रतनलाल किष्णाराम चौधरी ऊर्फ जाठ (वय २०, रा. बलदेवनगर, बालोतरा; मूळ रा. पिरानी साई योकीढाणी, बालोतरा) याला ११ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २ कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांचे १३८४ ग्रॅम मेफेड्रॉन हस्तगत करण्यात आले.

या तपासादरम्यान पुण्यातून फरार असलेला व अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये सक्रिय असलेला रामकरण जाट ऊर्फ चौधरी ऊर्फ सियाग (रा. कपोरिया ओसिया, जोधपूर) याला पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड व त्यांच्या पथकाने १२ फेब्रुवारी रोजी अटक केली. आरोपींकडून एकूण १९६० ग्रॅम मेफेड्रॉन, ३ कोटी ९२ लाख रुपयांचा ऐवज व ३५ लाख ९ हजार रुपयांचे मोबाईल, फॉर्च्युनर गाडी व तत्सम साहित्य असा एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.


या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करून एमडी रॅकेटमध्ये सक्रिय असलेली टोळी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत.

Feb 202623

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 20, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
Load More
Previous Post

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

Next Post

फसवणूक करणार्‍या किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta