महाशिवरात्री निमित्त १५ वर्षांची अखंड सेवा : हजारो भाविकांचा लाभ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे, शिरूर : महाशिवरात्रीच्या पावन यात्रेनिमित्त गेली १५ वर्षे अखंड सेवा परंपरा जपत रामलिंग रोड, शिरूर महाप्रसाद कमिटी श्री हाईट्स सोसायटी यांच्या वतीने भव्य १००० किलो साबुदाणा खिचडी महाप्रसाद वाटप कार्यक्रम भक्तिभावाने आयोजित करण्यात येत आहे.
या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात पहिल्या वर्षी केवळ ५ किलो साबुदाणा खिचडीपासून झाली होती. पंधराव्या वर्षी हा उपक्रम तब्बल १००० किलोपर्यंत पोहोचला असून, भाविकांच्या वाढत्या प्रतिसादाचे हे द्योतक आहे.
अहिल्यानगर व पुणे या दोन जिल्ह्यांतील तसेच श्रीगोंदा, पारनेर आणि शिरूर या तीन तालुक्यांतील हजारो भाविक दरवर्षी श्री रामलिंग ग्रामदैवताच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. यात्रामार्गावरच रामलिंग रोड, शिरूर येथे या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील व संबंधित तालुक्यांतील भाविक मोठ्या भक्तिभावाने या महाप्रसादाचा लाभ घेतात.
महाप्रसादामध्ये साबुदाणा खिचडीसोबत ३०० लिटर मठ्ठा व १४० डझन केळी यांचाही समावेश असतो. दरवर्षी हजारो भाविक दर्शनानंतर या महाप्रसादाचा लाभ घेतात. या सेवा उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सामाजिक ऐक्य व सेवाभावाचे सुंदर उदाहरण येथे पाहायला मिळते.
या उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक संदीप पंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, शिरूर आंबे गावचे शिवसेना तालुकाप्रमुख मल्हारी काळे, पिंपरी धुमाळाचे सरपंच मोहनराव चिखले, तसेच संतोष गायकवाड, प्रदिप (पप्पुशेट) तातेड, प्रविण शेलार, किशोर रूपनर, मनोज तातेड, राजेंद्र महाजन, प्रशांत गादिया, महेश कंदाकुरे, ॲड. गणेश काळे, भावेश शहा, नवनाथ दंडवते, हय्याजभाई शेख, मयूर शिंगाडे, सुयोग भन्साळी, विकास शिंगाडे, दिलीपशेट लुकंड, ललित नहार, प्रसाद हावळ, चंद्रकांत चोपडा, बाबूशेट खाबिया, यश जोशी, ओम रूपनर व श्री हाईट्स सोसायटीतील मित्र मंडळ व सदस्य आदींच्या सहकार्याने हा महाप्रसाद सोहळा यशस्वीपणे पार पडला आहे.
महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा महाप्रसाद सोहळा भक्तिभावात व उत्साहात यशस्वीपणे पार पडला आयोजकांनी सर्व सहकाऱ्यांचे व भाविकांचे आभार मानले.














