महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या जाहीर झालेल्या गुणतालिकेनुसार आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आदित्य सरोदे यांने विद्यापीठ स्तरावर पाचवा क्रमांक पटकविला आहे.
सावित्रीबाबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत एकुण 59 महाविदयालयातील दरवर्षी सुमारे 4500 विदयार्थी परीक्षेला बसले होते. त्यामुळे विद्यापीठ स्तरावरील गुणतालिकेमधील हे यश महत्वपूर्ण आहे.
सध्या स्कॉटलंडमधील ग्लासगोस्थित स्ट्रॅथक्लाईड विद्यापीठामध्ये पीएच. डी. चे शिक्षण घेत असलेल्या आदित्यने या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे समर्पित प्राध्यापक गण व उत्तम शैक्षणिक सोयी सुविधांना दिले आहे. पदवी दरम्यान मिळालेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा परदेशात उच्च शिक्षण घेत असतांनासुध्दा फायदा होत असल्याचे त्याने आवर्जून नमुद केले.
आदित्य सरोदेच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे, संकुल संचालक अमित विक्रम व विश्वस्थ तेजस पाटील यांनी आदित्यचे व त्याला शिकवणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.