महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील ब्राह्मण कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा भूम तालुका ब्राह्मण संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आणि दोषींवर कडक कारवाई करावी मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, की बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील अशोकराव राउतमारे कुटुंबीयावर राहत्या घरी अज्ञाताकडून भ्याड हल्ला केला असून त्यांच्या घराचे नुकसान करत त्यांच्या वाहनाचे नुकसान केले आहे.
या घटनेमुळे ब्राह्मण समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा भूम येथील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीन निषेध करत संबंधितांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी निवेदणाद्वारे केली आहे.
यावेळी ब्राह्मण संघटना तालुकाध्यक्ष सुधीर देशमुख, शहराध्यक्ष संजय शाळू, विलासराव शाळू, राजाभाऊ धर्माधिकारी, आनंद बेलसरे, निशिकांत कुलकर्णी, ए. पी. देशपांडे, भगवंत देशमुख, मयुर शाळू, नारायण आरगडे, लक्ष्मीकांत देशमुख, सचिन बारगजे, रत्नाकर आरगडे, अभिजीत पाटील, प्रवीण अघोर आदी यावेळी उपस्थित होते.