सूर्यदत्त ग्रुप ऑफ ज्युनियर कॉलेजेस चे विद्यार्थी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आघाडीवर : प्रा डॉ संजय बी चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता :
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ ज्युनियर कॉलेजेस चे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालय आणि सूर्यदत्त पब्लिक स्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी व बायफोकल अशा सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली. विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेचा १०० टक्के, वाणिज्य शाखेचा ९७ टक्के, तर कला शाखेचा ९६ टक्के निकाल लागला आहे.
सूर्यदत्त पब्लिक स्कूलच्या विज्ञान शाखेतील अरिव लालम मांडवकर व दित्या महेश पाटील यांनी ९२.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवला. कनक प्रतीक अग्रवाल (९२.५० टक्के), अथर्व सुनीत राणे (९२ टक्के) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेतील रोहन राजाराम क्षीरसागर (९१.६७ टक्के), अन्वी रोहित तायल (९०.८३ टक्के) आणि प्रांजल पंकज तुरंग (८९.८३ टक्के), तर कला शाखेतील इशिका मनीष वार्ष्णेयने ८८ टक्के, सावनी अमित कांतकने ८७ टक्के, तर जुई अतुल देशपांडे हिने ८५.५० टक्के गुण मिळवत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला आहे.
सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेत आहान विशाल नांदीमठ (९१.८३ टक्के), कपिल राहुल मुळ्ये (८८.१७ टक्के), अनिष परेश अवचट (८६.८३ टक्के), वाणिज्य शाखेत दिया मंगेश राजाध्यक्ष (९४.१७ टक्के), जिया रणजित कदम (८७.१७ टक्के), प्रथमेश दीपक शिंदे (७८.५० टक्के), तर कला शाखेत रिया अमित चौधरी (८४.८३ टक्के), यश अमित पुंडे (८४.३३ टक्के), इशिका मनीष अग्रवाल (८४ टक्के), तर व्यावसायिक अभ्यासक्रमातून (एमसीव्हीसी) देविका मंगेश कसुरंग (६७.६७ टक्के), पूर्णा गुरुप्रसाद कुलकर्णी (६६.३३ टक्के), आणि केदार मंदार जोग (६० टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला आहे. प्रा. डॉ. संजय बी चोरडिया म्हणाले की, कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चयाचे फळ नेहमीच चांगले मिळते आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार सूर्यदत्त संस्थेने विद्यार्थ्यांना अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी, उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडसह आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सर्व विषयांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की बारावीचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर मूल्यवर्धित उपक्रम, कार्यशाळा, कार्यक्रम, वक्तृत्व-निबंध लेखन – नाट्य इत्यादी विविध स्पर्धांमध्येही सहभागी होतात. पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन यांनी मार्गदर्शन सत्राद्वारे याची खात्री केली आहे की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना प्रगल्भ होत आहे.
जागतिक बाजारपेठेची गरज पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साधलेला माणूस म्हणून विकसित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुषमा चोरडिया उपाध्यक्ष व सचिव सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि अध्यक्ष स्वेला संस्था, स्नेहल नवलखा सहायक उपाध्यक्षा यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.
तसेच मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. व्यवस्थापनाने नमूद केले की कामगिरीतील सातत्यपूर्ण सुधारणा हा समाधानाचा मुद्दा आहे.
