नाशिक येथे होणार सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : व्हाईस ऑफ मीडियाचे बार्शी शहराध्यक्ष हर्षद लोहार यांची पश्चिम महाराष्ट्र विभाग उत्कृष्ट शहराध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
दि २५ मे २०२४ रोजी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन नाशिक येथे संपन्न होत आहे. यात हा विशेष सन्मान होणार आहे. दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होत असून. व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संदीप काळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ व प्राचार्य श्रीकांत सोनवणे हे प्रमुख अतिथी असतील. या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांना पुरस्कार व राज्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष व विभाग प्रमुख आदींनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत.
यामध्ये बार्शी शहराध्यक्ष म्हणून आजपर्यंत व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांची रक्त तपासणी शिबीर,पत्रकार व त्यांच्या संपुर्ण कुटुंबासाठी भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन, युवकांनी भविष्यात पत्रकारितेत करियर करावं म्हणून मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन आदी उपक्रम राबविले आहेत.
लोहार यांच्या निवडीबद्दल व्हाईस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका पदाधिकारी व सदस्यांनी तसेच साप्ताहिक, दैनिक व डिजिटल माध्यमातील सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले.
