महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : प.पू.डॉ.प्रतिभाजी म.मा. यांना ‘महाराष्ट्र प्रवर्तिनी पदवीने’ गौरविण्यात आले.
या निमित्ताने आनंद दरबार दत्तनगरचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या संकल्पनेतून आनंद दरबार येथे ‘सदभावना’ समारोह कार्यक्रमाचे आयोजन प.पू. गौरवमुनिजी म. सा., प.पू. प्रफुलाजी म. सा., प.पू. सिध्दी सुधाजी म. सा.आदि ठाणा १३ यांच्या पावन सानिध्य करण्यात आले होते.
यावेळी वयाच्या ८५ व्या वर्षी सलग पंधरा तास ‘नवकार महामंत्र’ लिहिण्याचा जागतिक विक्रम करणारे भगवानदास सुगंधी यांना ‘नवकाररत्न पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुमतीलाल लोढा, स्वागत अध्यक्ष डॉ. संजयकुमार चोरडिया, डॉ. अशोककुमार पगारिया, अनिल नहार, आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या गौतम प्रसादी चे भाग्यशाली होण्याचा मान फुलचंद लुणीया, शांतीलाल बाफना यांना मिळाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप संचेती, सुभाष पिरगळ, सुभाष लुणावत, विजय लोढा, संतोष भंडारी यांच्यासह आनंद दरबार दत्तनगर चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य भंडारी यांनी केले.
