जाणिव फाउंडेशन, पुणेतर्फे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून जाणीव फाउंडेशनतर्फे पुणे बुद्धा फेस्टिव्हलचे प्रथमच आयोजन पुणे शहरात कऱण्यात आले होते.. यामध्ये कवी संमेलन, प्रबोधनपर जलसा, बुद्ध लेणी प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व इतर सर्व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवार व गुरुवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पहिल्या सत्रात सेव्ह बुद्धा केव्हज अँड हेरिटेज या संस्थेतर्फे ऐतिहासिक बुद्ध लेण्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आर्टिस्ट कलाकार टीमतर्फे बुद्धांचे लाइव्ह पेंटींग व लाईट स्क्रप्लर मूर्ती बनवण्यात आली.
यावेळी डॉ. अमोल देवळेकर, अतुल बहुले, वसंत साळवे, प्रियदर्शन तेलंग, डॉ. राजाभाऊ भैलूमे, सीमा भालसेन हे मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी बुद्ध कवी संमेलन झाले. सहभागी कवींच्या सामाजिक, विडंबनात्मक व प्रबोधनपर कवितांनी रसिकांची मने जिंकली.. ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण हे कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. कवी विनोद अश्टुळ व कवी गोपाळ कांबळे यांनी कवी संमेलनाचे सुत्रसंचालन केले.
ऑस्करला धडक देणारे लोकशाहीर संभाजी भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रबोधनात्मक सामाजिक गीतांच्या माध्यमातुन वैचारिक जागर केला. महाबुद्ध वंदना, चित्रकला स्पर्धा, या उपक्रमांत सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.
चित्रकला स्पर्धा बक्षीस समारंभ व सन्मान कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सेलिब्रिटी स्टार ईशा हुबळीकर, युवा नेते राहुल डंबाळे, परीक्षक कवी गोपाळ कांबळे, राहुल वजाळे, संयोजक जाणिव फाउंडेशन अध्यक्ष अमोल काटे, अमोल ननावरे, दीपक गायकवाड, भाऊसाहेब आव्हाड, नवनीत अहिरे, गणेश चव्हाण, रवींद्र सोनावणे, विजय खुडे, राहुल नागटिळक, नितीन शेलार, गौरव जाधव, संजय भैलूमे, करण बोडदे, शेखर खंकाळ, वैभव वांधरे हे उपस्थित होते.
