शिबीरात ३२५ मुलांचा सहभाग
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी श्रावक संघ, बिबवेवाड़ी, पुणे येथे प.पु. श्री सौरवमुनिजी म. सा., उपप्रवर्तक प.पु. श्री गौरवमुनिजी म. सा., आदी ठाणा ४ महाराष्ट्र प्रवर्तिनी प.पु. श्री प्रतिभाश्रीजी म.सा., तपोनिधी श्री प्रफुलाजी म.सा., प.पु. श्री सिद्धिसुधाजी म.सा., आदी ठाणा १७ अश्या २१ साधू संतांच्या उपस्थितीमध्ये गुरु आनंद गणेश जैन धार्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी एकूण ३२५ मुले व मुलींनी सहभाग नोंदवला आहे. बिबवेवाड़ी जैन स्थानक (यश लॉन्सजवळ) येथे या बाल संस्कार शिबिराचे उदघाटन रमनलाल कपूरचंद लुंकड़ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून राजेश नौपतलाल सांकला उपस्थित होते.
या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट बालकांना संस्कारी मूल्ये आणि धार्मिक शिक्षा देणे असून, त्यांना विविध विषयांवर शिक्षण देण्यात येणार आहे. या प्रसंगी समाजाच्या सर्व थरातून साधारण ५०० भाविक उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने शोभा धारिवाल, बाळासाहेब धोका, राजेश नहार तसेच समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बिबवेवाडी संघाचे उपाध्यक्ष माणिकचंद दुगड यांनी सूत्रसंचालन केले व महामंत्री गणेश ओसवाल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, गणेश ओसवाल, अविनाश कोठारी, प्रकाश गांधी, सुनिल बलाई, चंद्रकांत लुंकड, रमणलाल लुंकड, अशोक नहार, रामलाल संचेती तसेच सत्य साधना महिला मंडळाच्या सदस्या व श्रुत बहुमंडळाच्या सदस्यांनी बहुमोल योगदान दिले















