महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वारकरी आचारसंहिता परीषद तथा हरिभक्त परायण निलेश महाराज झरेगावकर संकल्पित राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिजनासाठी किर्तन सोहळा उत्साहात पार पडला.
माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या “जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो” या पसायदानाच्या आकांक्षाचे प्रकटीकरण या सोहळ्यात करण्यात आले. सोहळ्यात राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज व निलेश महाराज झरेगावकर यांनी मार्गर्शन केले.
हा कीर्तन सोहळा अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतून व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कारागृहातील चार भिंतीच्या आत बंदीस्त बंदीजनांच्या मनावर किर्तनाच्या अभिसिंचनाने मन परीवर्तन घडवुन “नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी” या जाणिवेतून त्यांच्या अंतरीच्या ज्ञानदीप प्रज्वलित होईल. भक्तीच्या शक्तीची महती संक्रमित करण्यास हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल अशी आशा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे. अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, पी. पी. कदम उपअधीक्षक, एम. एच. जगताप, उपअधीक्षक, मंजीरी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, दक्षता पथक, उपमुख्यालय, पश्चिम विभाग, पुणे, आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी. सी आर सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, व्ही. के. खराडे, सुभेदार तसेच भजनी मंडळ, देवाची आळंदी यांनी यांनी प्रयत्न केले.















