महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
लायन्स प्रांत 3234 D 1 च्या पदाधिकाऱ्यांची प्री कॅबिनेट मीटिंग सांगली येथील ‘ककून हॉटेल’ मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली . विविध सत्रात पदाधिकारी, सदस्ययांना मार्गदर्शन करण्यात आले.
या मिटिंगला कॅबिनेट मेंबर, मायक्रो कॅबिनेट मेंबर, रिजन चेअरमन, झोन चेअरमन तसेच माजी प्रांतपाल गण उपस्थित होते. माजी प्रांतपाल लायन बाबासाहेब पवार, ला. गुलाबचंद शहा, ला. केशव फाटक, ला. डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, ला. जगदीश पुरोहित, ला. सुनील सुतार, ला. वासुदेव कलघटगी, लायन विजयकुमार राठी हे सर्वजण उपस्थित होते.
प्रांतपाल ला. भोजराज नाईक निंबाळकर, नव नवनिर्वाचीत प्रांतपाल एम. जे. एफ. लायन ॲड. म. के. पाटील, प्रथम उपप्रांतपाल (निर्वाचित) ला. डॉ. विरेंद्र चिखले, द्वितीय उपप्रांतपाल (निर्वाचित) ला. राजेंद्र शहा यांनी ही उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मुंबईचे माजी प्रांतपाल ला. डाॅ. दीपक चौधरी (प्रांत 3231 A 3) यांनी केले.
रविवारी दुसरे सत्रप्रांताचे पीएसटी आणि फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट स्कूलिंग अध्ययन संजय घोडावत इन्स्टिटय़ूट, अतिग्रे, कोल्हापूर येथे झाले. या अध्ययन स्कूलिंग मध्ये प्रांतातील एकूण 51 क्लब आणि 174 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.
या कार्यक्रमासाठी नव नवनिर्वाचीत प्रांतपाल एम. जे. एफ. लायन ॲड. म. के. पाटील यांचा मार्गदर्शनाखाली जी. एल. टी. कोऑरडिनेटर ला. डॉ. शेखर कोवळे यांनी अत्यंत उत्साहपूर्ण अशी मेहनत घेतली. प्रमुख पाहुणे आणि मुंबईचे माजी प्रांतपाल ला. दिपक चौधरी (प्रांत 3231 A3) यांनी आपल्या ओघवत्या वाणीने MISSON 1.5 या विषयी मार्गदर्शन केले.
माजी प्रांतपाल ला. जगदीश पूरोहित, ला. वासुदेव कलघटगी, ला. सुनील सुतार आणि ला. राजेंद्र शहा कासवा त्याचबरोबर ला. शेखर कोवळे यांनी मार्गदर्शन केले डॉ. विरेंद्र चिखले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपले माजी प्रांतपाल ला. विजयकुमार राठी यांनी या केटरिंगची जबाबदारी पार पाडली.
या सर्व अध्ययन स्कूलिंग चे काम माजी प्रांतपाल ला डाॅ. व्यंकटेश यजुर्वेदी यांनी अत्यंत चोख सांभाळले तसेच हे कार्य यशस्वीपार पाडण्यासाठी प्रांताचे नियुक्त सचिव डॉ. लायन. आभिजीत जोशी, नियुक्त खजिनदार पी. एम. जे. एफ. लायन. महेश नळे व प्रांताचे सि. ओ. ला. गंगाप्रसार बंडेवार यांनी परिश्रम घेतले.
