महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बार्शी तालुक्यात मृगाच्या सरींनी सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.त्यामुळे शेतकऱ्याने आता पेरणीची तयारी सुरु केली आहे.
बळीराजा थेट बियाणांच्या दुकानात दाखल झाल असून बियाण्यांची खरेदी करू लागला आहे. त्याच अनुषंगाने शहरातील विविध बी – बियाणे दुकानात शेतकरी खरेदीसाठी दाखल झाला आहे. तूर मूग उडीद अशा विविध कडधान्यांचे बियाणे घेण्यासाठी बाजारपेठेत शेतकरी गर्दी करीत असल्याचे दिसून आले.
शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी बीज प्रक्रिया करूनच आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे बीबीएफ पध्दतीने किंवा टोकण पद्धतीने पेरणी करावी. शेतकऱ्यांने बियाणे व खते खरेदी करताना विशिष्ठ खते अथवा बियाण्यांसाठी आग्रह धरू नये. खते बियाणे खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्र मधून पक्की बिले घेऊन खरेदी करावी असे आवाहन बार्शी तालुका कृषी अधिकारी एस.एस. कोयले यांनी केले आहे.















