महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करण्यासाठी अंतरवली सराटीकडे निघालेल्या लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
आपण बार्शी पोलीस ठाण्यात असल्याचे छायाचित्र सोशल मीडिया मध्ये शेयर करत हाके यांनीच यास दुजोरा दिला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
लक्ष्मण हाके यांना रात्री एक वाजता नोटीस देऊन पोलीसांनी सोडले. रात्री एक वाजता ते बीडकडे रवाना झाले.
अंबड येथील ओबीसी समाज लक्ष्मण हाके यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी येथे प्राणांतिक उपोषण करण्यासाठी जात असताना पोलीसांनी रोखले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळाजवळ ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषण सुरू करणार होते.
