सगे-सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : महाराष्ट्र शासनाने सगे-सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी व मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे, अन्यथा होणाऱ्या तीव्र आंदोलनास व रोषास सरकारलां सामोरे जावे लागेल असा इशारा सकल मराठा रणरागिनी भूम यांनी आज भुम येथील गोलाई चौकात आंदोलन करुन दिला. यावेळी तहसीलदार यांना संघटनेतर्फे निवेदन व बांगड्यांचा आहेर देण्यात आला.
मराठा योद्धा मनोज जरांगे दादा पाटील यांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री महोदयांनी सगे-सोयरे च्या कायद्याची अधिसूचना काढली होती, या सदरील अधिसूचनेची अंमलबजावणी करून सदरील अधिसुचेनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून उपोषणास बसलेले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदयांनी सगे सोयर्याच्या अधिसुचेनेचे तातडीने कायद्यात रूपांतर करावे अशी आमची मागणी आहे. येणाऱ्या काळात जर सदरील अधिसुचेनेचे कायद्यात रूपांतर नाही केले आणि जरांगे पाटील यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे.
सरकारने जर मराठ्यांना आरक्षण नाही दिले तर बांगड्या भराव्यात त्या बांगडी चोळीचा आहेर आम्ही आज आपणास देत आहोत. आजवर मराठा आरक्षणासाठी 58 मूक मोर्चा, शेकडो सभा, लाखोंच्या संख्येने निवेदने, पाचशेच्या आसपास आत्महत्त्या झालेल्या आहेत.
आंदोलन महिला रण-रागिणी हातात घेणार
मराठा आरक्षणासाठी मागील 10 महिन्यात मनोज दादा जरांगे पाटील यांचे हे चौथे उपोषण आहे. उपोषणास आता आजपर्यंत सहा दिवस झाले आहेत. आता जर मराठा आरक्षणाची अधिसूचना कायद्यात रूपांतरित नाही केली. तर या पुढे हे आंदोलन महिला रण-रागिनी हातात घेणार आहे आणि हे सरकारला परवडणारी गोष्ट नाही. असा इशारा या निवेदनात दिला आहे.