महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बहिणीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे रागातून तिच्या भावाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी ०१:३० वाजता येरवडा येथील राजीव गांधी नगर परिसरात घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली.
कठाळू कचरूबा लहाडे (वय ६०, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी इस्माईल रियाज शेख (वय २४), संकेत उमेश गुप्ता (वय २१, दोघेही रा. राजीव गांधी नगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत लहाडे यांचा मुलगा धम्मकिरण लहाडे (वय २५) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील राजीव गांधीनगरमध्ये लहाडे व शेख पोलिस कुटुंबीय राहतात. कठाळू यांचा मुलगा योगेश लहाडे (वय २४) याने मुलाच्या बहिणीला पळवून नेऊन विवाह केला होता.
त्याचा राग मनात धरून कठाळु कचरुबा लहाडे (वय ६० वर्ष रा. रा. स. नं. ११५ राजीव गांधीनगर मेंटल कॉर्नर आळंदी रोड येरवडा पुणे यांचे वर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन त्यांना जिवे ठार मारले आहे. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक केली आहे. रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा. पो. निरीक्षक. मिथुन सावंत तपास करीत आहेत.

















