महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विक्रमबात्रा वसाहतिच्या समोर, केंद्रीय महाविद्याल्याच्या बाजूला, लुल्लानगर, वानवडी पुणे येथे आर्मी एरियातील मोकळ्या जागेत एका युवकाचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जून रोजी रात्री ही घटना घडली. लाकडी दांडक्याने तसेच अन्य कोणत्या तरी धारदार हत्याराने गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेद्र करणकोट तपास करीत आहेत.

















