महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ऑल इंडिया फर्निचर अँड ट्रेडर्स लिमिटेड च्या कोअर कमिटीची सभा नुकतीच पाचगणी येथे पार पडली. या सभेसाठी देशभरातून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेत सर्व प्रतिनिधींनी व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल तसेच समस्या बाबत चर्चा केली. मुंबई अॅपेक्स कमिटीचे चेअरमन हुझेफा सॅम्पलवाला वाला यांनी ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड (BIS) बाबत मार्गदर्शन केले.
स्वीट मेमोरियल स्कूलच्या चंद्राबेन शहा व त्यांचे चिरंजीव धवल शहा यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. ए एफ एम टी पुणे रिजनल चॅप्टरच्या अध्यक्षा दक्षा सुरेश जैन व त्यांच्या सहकार्यामुळे सभा यशस्वी रित्या पार पडली.
