महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने कोथरूड मधील एका महिलेची १६ लाखाची फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी ५१ वर्षीय महिलेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ६ मे ते ६ जून या महिन्याभरात हा प्रकार घडला आहे. राहत्या घरी ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करुन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करुन त्यामधुन चांगला परतावा मिळेल असे अमिष आरोपीने दाखवले.
त्यानुसार फिर्यादी यांची वेळोवेळी रकमा त्याच्या खात्यात जमा केल्या. एकुण १६,५७,५५७/- रुपयांची आर्थिक फसवणुक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे), विक्रमसिंह कदम तपास करीत आहेत.
