महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बँकेसाठी माहिती हवी आहे असे खोटे सांगून कात्रज मधील एकाची दहा लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
या प्रकरणी एका ६५ वर्षीय इसमाने भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात मोबाईल धारक युवकाने फिर्यादी यांना स्टेट बँक ऑफ इंडिया मधुन मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले.
फिर्यादीचा १६ नं. फॉर्म भरण्याकरिता मोबाईल व्हॉटसअॅप मेसेज द्वारे पाठविलेल्या फॉर्म मध्ये फिर्यादी यांचे बँक खात्याचे डिटेल्स भरावयास लावले.
फिर्यादीच्या बँक खात्यामधुन अनुक्रमे ४,९९,०००/- रू. व ५,००,०००/- रू. असे ९,९९,०००/- रू. ट्रान्सफर करून घेवुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक शरद झिने करीत आहेत.
